RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत, हडपसर भागाच्या वतीने रविवारी हडपसर येथे ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसरमधील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि वैचारिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला पत्रकार, वकील, प्राध्यापक, समाज माध्यम प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अखिल भारतीय प्रचार विभाग टोळीचे सदस्य अजिंक्य कुलकर्णी यांनी “संघाचे नेतृत्व, हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान आणि तळागाळातील ‘शाखा’ या तीन भक्कम स्तंभांवर संघाची शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल उभी आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजवून व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणी करणे, हेच संघाचे प्रमुख ध्येय आहे,” नमूद केले.
RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणी हेच RSS चे ध्येय
अजिंक्य कुलकर्णी म्हणाले की, संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांनी प्रसिद्धीपासून दूर राहत संघटन उभारणीचे कार्य केले. हिंदुत्वाच्या माध्यमातून देशाला परमवैभवाकडे नेण्याची संघाची भूमिका स्पष्ट असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम संघ गेल्या अनेक दशकांपासून करत आहे. विविध जाती, भाषा आणि प्रांतातील लोक शाखेमध्ये एकत्र येऊन स्वतःला सर्वप्रथम भारतीय म्हणून ओळख देतात, हीच संघाची खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: “राष्ट्र प्रथम” विचारातून समाज एकत्र येतो
वीज निर्मितीच्या ग्रीडचे उदाहरण देत त्यांनी संघाच्या शाखा पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले. “वीज निर्मितीचे स्रोत वेगवेगळे असले तरी ग्रीडमध्ये आल्यानंतर ती एकच ऊर्जा बनते. त्याचप्रमाणे शाखेत येणारे स्वयंसेवक विविध पार्श्वभूमीतून आलेले असले तरी शाखेत ते सर्व भेद विसरून राष्ट्रभावनेने एकत्र येतात,” असे त्यांनी सांगितले.
RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: पंच परिवर्तनावर विशेष चर्चा
कार्यक्रमात श्री. मनोज पोस्ट यांनी संघशताब्दी वर्षानिमित्त समाजात “पंच परिवर्तन” आवश्यक असल्याचे सांगितले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि संतुलन, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्य या पाच महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: शाखा : व्यक्ती निर्माणाचे मुख्य केंद्र
संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘शाखा’ पद्धती. शाखा हे केवळ एकत्र येण्याचे ठिकाण नाही, तर ते देश आणि समाजाबद्दल प्रेम निर्माण करणारे ‘व्यक्ती निर्माण’ केंद्र आहे. या शाखेतूनच घडलेले स्वयंसेवक आज देशाच्या विविध क्षेत्रांत आणि संस्थांमध्ये (अॅपॅरेटस) जाऊन राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून निस्वार्थपणे काम करत आहेत. समाजात एकोपा टिकवून ठेवण्यात या शाखांचे मोठे योगदान आहे, असे अजिंक्य कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
Rss Official Website: https://www.rss.org/
RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: प्रश्नोत्तरातून चर्चा
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल समाजात असलेल्या विविध गैरसमजांवर चर्चा करत उपस्थित वक्त्यांनी अनेक शंकांचे निरसन केले. हडपसर आणि पूर्व पुणे परिसरात एकेकाळी मर्यादित असलेले संघाचे कार्य आज मोठ्या प्रमाणात विस्तारले असून हजारो कुटुंबे संघाशी जोडली गेली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाला एकूण ५३ पुरुष आणि १२ महिला उपस्थित होत्या.
अधिक वाचा :
- Maharashtra SSC Result 2026: विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
- Pune Traffic Police Saved Life: मार्केट यार्ड येथे बेशुद्ध व्यक्तीचा जीव पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला
- Katraj Ghat Accident Pune: कात्रज घाटात भीषण अपघात – रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघेजण जखमी
👉 अशाच ताज्या, धडाकेबाज आणि विश्वासार्ह पुणे व महाराष्ट्रातील बातम्यांसाठी
आजच Voice of Loksurajya ला Follow, Subscribe आणि Like करा!
📲 Breaking News | Crime Updates | Pune News | Maharashtra News



