मसाज पार्लरच्या आड सुरू होता देहव्यापार, तीन महिलांची सुटका Pune Crime News
पुणे | दीपक शिंदे
Pune Crime News पुण्यातील वानवडी परिसरातील परमार गॅलरी, परमार पार्क रोड, जगताप चौकाजवळ असलेल्या ‘स्काय स्पा’ या मसाज सेंटरवर वानवडी पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. तर स्पा सेंटरचा मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
Pune Crime News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.२५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक (पंटर) पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर ‘स्काय स्पा’ येथे छापा टाकण्यात आला.
Pune Crime News कारवाईदरम्यान रुबीका उर्फ लालरेम्पुइ थॉंगलियाना (वय ३३) हिला ताब्यात घेण्यात आले. तर स्पाचा मालक गोविंद रामचंद्र धारवल (वय २६) हा फरार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News तपासात ग्राहकांकडून मसाजच्या नावाखाली पैसे घेऊन परराज्यातील महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आरोपींची उपजीविका सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police Official Website: https://punepolice.gov.in
Pune Crime News ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव आणि पोलीस उपनिरीक्षक सारिका शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिसांच्या पथकाने केली.
Pune Crime, Wanwadi Police, Sky Spa, Spa Raid, Prostitution Racket, Wanwadi News, Pune Police, Crime News, Massage Parlour Raid, Human Trafficking, पुणे, वानवडी, स्काय स्पा, देहव्यापार, गुन्हेगारी, पोलीस कारवाई
#Pune #Wanwadi #BreakingNews #PuneCrime #WanwadiPolice #SkySpa #CrimeNews #PoliceRaid #Maharashtra #VoiceOfLoksurajya
अधिक वाचा :




