काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई; फटाका सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेज चालकांसह ११ जणांवर गुन्हा
पुणे | दीपक शिंदे – मुख्य संपादक
पुणे Bullet Silencer Crackdown शहरात मध्यरात्री रस्त्यांवर बुलेट मोटारसायकलींच्या मॉडिफाईड ‘फटाका सायलेन्सर‘चा कर्णकर्कश आवाज करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील ११ बुलेट मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या तीन गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई ३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या मध्यरात्री कडनगर चौक, न्याती चौक आणि महम्मदवाडी परिसरात घडलेल्या घटनांनंतर करण्यात आली. संबंधित तरुणांनी बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाईड फटाका सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात रस्त्यावरून फेऱ्या मारल्या. या प्रकाराचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर रील्स बनवण्यात आल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक कारवाई
Bullet Silencer Crackdown मध्यरात्री अचानक फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज होत असल्याने परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत संबंधित वाहनचालकांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित मोटारसायकली शोधून काढल्या आणि घटनास्थळावरून ११ बुलेट मोटारसायकली जप्त केल्या. त्याचबरोबर त्यावरील बेकायदेशीर फटाका सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले.
या व्यक्तींवर कारवाई
Bullet Silencer Crackdown कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते
- सुमीत वसंत सगट (वय २०) – इंदिरानगर, महम्मदवाडी
- शिवम दीपक जाधव (वय २१) – इंदिरानगर, महम्मदवाडी
- आर्यन जगन्नाथ गायकवाड (वय १९)– इंद्रायणीनगर, महम्मदवाडी
- सार्थक प्रदीप अल्हाट(वय १८) – कृष्णानगर, महम्मदवाडी
- राज उर्फ यश सागर रणदिवे (वय १९)– कृष्णानगर, महम्मदवाडी
- तुषार नितीन गायकवाड (वय 2१) – कृष्णानगर, महम्मदवाडी
- धिरज लक्ष्मण गेंजगे (वय 23) – कृष्णानगर, महम्मदवाडी
- प्रेम गायकवाड (वय 21) – गोपाळपट्टी, मांजरी
- दयानंद सुतार (वय 50)– तरवडे वस्ती, महम्मदवाडी
- बरद सनी तोडकर (वय १८) – काळेपडळ
- दिनेश रितेश लांबोटे (वय १९) – सुखकर्ता अपार्टमेंट, महम्मदवाडी
- राजेंद्र सतीश वाघमोडे (वय 18) – महम्मदवाडी
- रवि किसन लोखंडे (वय २०) – शेल पंपामागे, महम्मदवाडी, यांच्यासह अन्य संबंधित दुचाकीस्वारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मॉडिफाईड सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाई
Bullet Silencer Crackdown फक्त दुचाकीस्वारांवरच नव्हे तर बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
- युसूफ फारुख शेख (वय २४) – सय्यदनगर
- निखील फुलाजी सरडे (वय २६) – काळेपडळ
- रोहन बबलू महापुरे (वय २४) – महम्मदवाडी
गॅरेजमध्ये फटाका सायलेन्सर बसवून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आणखी आरोपींचा शोध सुरू
Bullet Silencer Crackdown काळेपडळ पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, परिसरात फटाका सायलेन्सरचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या इतर मोटारसायकलस्वारांचाही शोध सुरू असून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
Bullet Silencer Crackdown ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, राजस शेख तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहिद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि लक्ष्मण काळे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली.
वाहतूक नियम आणि वाहनांमध्ये बेकायदेशीर बदलांबाबत अधिक माहितीसाठी Pune City Police आणि Parivahan Sewa आणि Ministry of Road Transport & Highways (MoRTH) यांच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या.
अधिक वाचा :
हेही वाचा:
मध्यरात्री ‘बुलेट फटाका सायलेन्सर’चा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त Bullet Silencer Crackdown
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार आरोपींवर MCOCA लागू; वानवडी पोलिसांची मोठी कारवाई,
आषाढी एकादशी 2026 : उपवास, वारी आणि श्रीविठ्ठल भक्तीचा महिमा




